मुंबई : सुफरफास्ट तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा मिळालाय. रेल्वेच्या वेळेपत्रकानुसार २० मार्चपासून तेजस गाडी चिपळूण येथे थांबेल. ती सकाळी ९.४ मिनिटांने चिपळूणला पोहोचेल. ही एक्स्प्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्माळी अशी आठवड्यातून पाच दिवस धावते.
पुढील आठवडाभरात तेजस एक्स्प्रेस चिपळूण रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. तेजस एक्स्प्रेस येता-जाता चिपळूण रेल्वेस्थानकात थांबत होती. मात्र हा थांबा प्रवासी थांबा नसल्याने चिपळूणवासियांना त्याचा कोणताही फायदा होत नव्हता. मुंबईतून २२११९ ही गाडी चिपळूणला सकाळी ९.४ वाजता पोहोचेल. तर परतीच्या मार्गावर २२१२० ही गाडी संध्याकाळी ६.१८ वाजता येईल. त्यामुळे याचा लाभ प्रवाशांना होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी सुखसोयी युक्त तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा देण्यात आलाय. अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. कोकणातील चिपळूण हे एक महत्वाचे रेल्वेस्थानक असल्यामुळे त्याठिकाणी तेजस एक्स्प्रेसला प्रवासी थांबा मिळावा याकरिता शिवसेना खासदार विनायक राऊत यानी पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेय.