video: मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर अटक..CCTV फुटेजच्या आधारे लागला शोध

ही संपूर्ण घटना सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात 21 वर्षांची  मुलगी जखमी झालीये..

Updated: Oct 15, 2022, 01:41 PM IST
video: मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर अटक..CCTV फुटेजच्या आधारे लागला शोध  title=

ठाणे  :ठाण्यात मुलीला फरफटत नेणा-या रिक्षाचालकाला अटक करण्यात आलीय (Girl molested by auto driver in thane)...नवी मुंबईतून आरोपी कटिकादाला उर्फ राजू विरांगनेलूला अटक करण्यात आलीय...मुंबईतील दिघा येथून या रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

मुलीला फरफटत नेतानाचा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला होता...त्यानंतर विनयभंग (harrasement) आणि छेडछानी (tamperingwith girl in thane) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.... तातडीने या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी हजर करण्यात आलंय...आरोपी राजू हा मुळचा आंध्र प्रदेशचा (aandhra pradesh) आहे...त्याने असं का कृत्य केलं...? मुलीला फरफटत नेण्याचं खरं कारण काय होतं...? याची चौकशी सुरूयेय... (Thane girl molested by auto driver rikshawala is now arrested people requested CM eknath shinde to look into this )

आणखी वाचा: Big News: अमित शाह यांच्यावरचा धोका टळला; निवासस्थानी सापडला विषारी साप, पाहा Video

ही संपूर्ण घटना सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात 21 वर्षांची  मुलगी जखमी झालीये, मुलीला फरफटत नेल्याचं कारण हे चौकशी नंन्तर समोर येईलच, मात्र हा संपूर्ण प्रकार अत्यंत संतापजनक आहे हे नक्की. 

 नेमका काय होता प्रकार 

ठाणे स्टेशन रोड परिसरात एक शाळकरी मुलगी रिक्षातून उतरते मात्र  रिक्षाचालक तिचा हात पकडून काही अंतर तिला अक्षरशः फरफटत नेतो त्यांनतर ही मुलगी रस्त्यावर पडली आणि जखमी झाली. या विद्यार्थिनीला दुखापत झाली आणि हा संपूर्ण प्रकार जवळील cctv मध्ये कैद झाला. यांनतर रिक्षाचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. 

आणखी वाचा: साप चावल्यावर या गोष्टी करणं  टाळा.. नाहीतर जाईल जीव 

संपूर्ण प्रकारानंतर ठाण्यात महिला असुरक्षित असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यावं अशी विनंती सर्वांकडून करण्यात आली. आणि लगेचच cctv फुटेजच्या आधारे रिक्षावाल्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
मात्र तरीही महिला  सुरक्षित आहेत हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. (Thane girl molested by auto driver rikshawala is now arrested people requested CM eknath shinde to look into this)