Lok Sabha election 2024 : शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शिक्षकांवर जबरदस्ती करण्यात आली. शिक्षकांमार्फत कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार केल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिका-यांनी केला आहे. महायुतीचे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी कॉलेजमध्ये दाखल झाले असून, कॉलेजमधील शिक्षकांना प्रचारासाठी सक्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकांनी 20 नातेवाईकांना भेटून प्रचार करावा, त्यासाठी फॉर्म वाटप झाल्याचा दावा महायुतीच्या पदाधिका-यांनी केला आहे. वाटलेले फॉर्म दाखवत प्राचार्य व्ही एन पाटील यांना जाब विचारला.
शाहू महाराज यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत असं मंडलिक यांनी म्हंटलंय. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं मंडलिक म्हणालेत. चंदगड तालुक्यातील नेसरीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. संजय मंडलिकांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांनी सडकून टीका केलीय. शाहू महाराज वंशज नाहीत तर काय संजय मंडलिक वंशज आहेत का असा खडा सवाल राऊतांनी विचारलाय. आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत असं वादग्रस्त विधान मंडलिकांनी केलं होतं, त्याला राऊतांनी उत्तर दिले.
खासदार संजय मंडलीक यांनी आधी टीका केली आणि नंतर हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये असं आवाहनं केले. मुश्रीफ यांनी बोलताना अजूनही वेळ गेली नाही उमेदवारी अर्ज भरायला वेळ आहे, शाहू महाराज यांनी फेरविचार करावा असं आवाहन केले.