कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वारुळ गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पुलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत कोसळली.
स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने गाडीतील तिघेजण सुखरूप बचावले.
पावसाळी पिकनिकसाठी तिघं मित्र इंचलकरंजीहून शाहूवाडी तालुक्यातील केर्ले धबधबा पाहण्यासाठी जात होते. शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हि घटना घडली असून अपघातग्रस्त कार पुराच्या पाण्यात अडकून पडलीय.