सोनिया गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी ED चौकशी; कॉंग्रेसकडून दिल्लीसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

सोनिया गांधींची आज तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी होणार आहे. सोनिया गांधी दुपारी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. 

Updated: Jul 27, 2022, 01:31 PM IST
सोनिया गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी ED चौकशी; कॉंग्रेसकडून दिल्लीसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन title=

मुंबई : सोनिया गांधींची आज तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी होणार आहे. सोनिया गांधी दुपारी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. 

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी  ईडीसमोर हजर होण्याची ही तिसरी वेळ आहे. काल सोनियांची तब्बल 6 तास ईडी चौकशी झाली. 
 
सोनिया गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू असल्याने दिल्लीत काँग्रेसचं संसद प्रांगणात आंदोलन सुरू आहे. राज्यातही मुंबई, पुणे शहरांमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

नागपुरात ED कार्यालयावर काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. नागपुरात सिव्हिल लाईन्स इथे काँग्रेसने आंदोलन केलं. तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि फौजफाटा तैनात करण्यात आला.

नवी मुंबईत कॉंग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली वाशीत आंदोलन करण्यात आलं. यावेळी ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुण्यात ईडीविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आले.  केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकार गैरवापर करत असल्याचीा आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला. ईडीविरोधात काँग्रेसने शांततेत सत्याग्रह आंदोलन केलं. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सतत ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं जात आहे. त्यामुळे बोरिवली स्टेशनवर युवक काँग्रेसकडून मेल एक्स्प्रेस रोखत निषेध करण्यात आला. यावेळी सर्व युवक आंदोलनकर्त्यांची रेल्वे पोलिसांनी धरपकड केली आणि ताब्यात घेतले.