Smart City : देशभरातील 100 स्मार्ट सिटी कंपन्या आपला गाशा गुंडाळणार?

Smart City Mission:देशभरातील 100 स्मार्ट सिटी कंपन्यांचा गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  

Updated: Apr 19, 2022, 03:33 PM IST
Smart City : देशभरातील 100 स्मार्ट सिटी कंपन्या आपला गाशा गुंडाळणार? title=

मुंबई : Smart City Mission:देशभरातील 100 स्मार्ट सिटी कंपन्यांचा गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एक एप्रिलपासून निविदा प्रक्रिया न राबवण्याचे स्पष्ट आदेश केंद्राने स्मार्ट सिटी कंपन्यांना दिलेत. 

तसेच नाशिकमधून स्मार्ट सिटी प्रकल्प गाशा गुंडाळणार आहे. गेल्या सहा वर्षांत केवळ आठच कामे झाल्याचे सांगण्यात येतआहे. तसेच 31 मार्चनंतर एकही नवी निविदा काढू नये असे आदेश देण्यात आले होते. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पात नाशिकची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली होती. त्यात 1200 कोटी रुपयांची कामे केली जाणार होती. मात्र, सहा वर्षात चौवीस कामांचे नियोजन होते. परंतु प्रत्यक्षात आठच कामे पूर्ण झालीत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिश्न उस्थित करण्यात येत आहे.

हा सर्व कारभार संबंधिक महापालिकांच्या ताब्यात जाणार आहे. केंद्राने 25 जून 2015ला स्मार्ट सिटी मिशनची सुरुवात केली होती. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता स्मार्ट सिटी कंपन्या आपला गाशा गुंडाळणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कल्याण डोंबिवली आणि सोलापूर या शहरांमध्ये स्मार्ट सिटी कंपन्यांची स्थापना होणार आहे. 

स्मार्ट सिटीज मिशनचा उद्देश स्थानिक क्षेत्राचा विकास आणि तंत्रज्ञान, विशेषत: स्मार्ट परिणामांकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आर्थिक विकासाला चालना देणे आणि लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे.