Vasai Conversion Case : गाझियाबदमध्ये उघडकीस आलेल्या ऑनलाईन गेम धर्मांतरण प्रकरण मुंब्रा येथून वसईपर्यं पोहचले. वसईच्या जानी परिवाराला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता या वसईतील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पित्याला मुस्लीम बनवले. मात्र, मुलाचे धर्मांतर करण्याचा डाव कसा फसला हे आता उघडकीस आले आहे.
ऑनलाईन गेम धर्मांतरणाचं प्रकरण वसईतही समोर आले. वसईच्या जानी परिवारातील सदस्य राजेश जानी यांना धर्मांतराच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. राजेश जानींना महमूद रियाझ बनवल्यानंतर धर्मांतरासाठी आपल्यावर दबाव आणला जातोय असा आरोप त्यांनी केला होता.
वसई धर्मांतर प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. वसईतील राजेश जानी या इसमाला मुस्लिम बनवल्यानंतर त्यांच्या 18 वर्षांच्या मुलाचंही फोनवरुन धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आले. देवांग जानीला मुंब्रा येथील मोहसीन सोनी हा इसम फोनवरुन इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. देवांगनं मोहसीनच्या जाळ्यात न फसता माणिकपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार मोहसीनला मुंब्र्यातून अटक करण्यात आली आहे.
मोबाईल गेमिंग जिहादप्रकरणातील मुख्य आरोपी शहानवाजला 11 जून रोजी मुंब्रा पोलिसांनी अटक केली. अलिबागच्या एका लॉजमधून शहानवाजला अटक करण्यात आली. 400 जणांच्या धर्मांतर प्रकरणातील शहानवाज मुख्य आरोपी आहे. मुंबईच्या वरळीतून शहानवाज अलिबागमध्ये पळाल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. उत्तरप्रदेश पोलिसही त्याच्या मागावर होते.
मोबाईल गेमिंग जिहादप्रकरणातला मास्टरमाईंड शहानवाज खानचा अलिबागमधील सीसीटीव्ही समोर आला आहे. 10 जूनला रात्री साडे आठ वाजता शहानवाज आपल्या भावासोबत लॉजमध्ये चेक इन केले. त्यावेळी त्याने बनावट नंबर आणि चुकीचा पत्ता देऊन अलिबागमध्ये रूम बुक करून राहिला. तिथे एअरकंडिशन रुममध्ये राहून शहानवाज बातम्या पाहता होता असे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे.