रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 45 वर्षांवरील लोकांना कोविडशिल्डचा दुसरा डोस

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात प्रादुर्भाव होत आहे. (Coronavirus in Ratnagiri) जवळपास दिवसाला 450 पेक्षा रुग्णांची नोंद होत आहे.  

Updated: May 10, 2021, 10:50 AM IST
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 45 वर्षांवरील लोकांना कोविडशिल्डचा दुसरा डोस title=
संग्रहित फोटो

 मुंबई : कोरोनाचा मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात प्रादुर्भाव होत आहे. (Coronavirus in Ratnagiri) जवळपास दिवसाला 450 पेक्षा रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच मृत्यूसंख्या वाढत असल्याने चिंतेत अधिक भर पडत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाविरुद्धचा लढ्यासाठी कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. आता रत्नागिरीत (Ratnagiri ) केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या लसीच्यासाठ्यामधून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सोमवारपासून प्राधान्याने कोविडशिल्ड (Covidshield) लसीच्या दुसऱ्या डोससाठी असणाऱ्या 45 वरील पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

 ज्यांनी कोविड शिल्ड लसीची पहिली मात्रा घेतलेली आहे. त्यांनी  कोविड शिल्ड लसीची दुसरी मात्रा घ्यायची आहे. सोमवार  सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुसऱ्या लसीचा डोस 45  वर्षावरील नागरिकांना देण्यात येणार आहे. तरी कोविड शिल्ड  लसीच्या दुसऱ्या डोससाठी देय असणाऱ्या 45  वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांनी  लसीकरण क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आपली नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लसीकरण केंद्रा ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी करु नये. कोरोनाची  योग्य ती खबरदारी लसीकरण  केंद्रावर घ्यायची  आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहेे.

दरम्यान, रत्नागिरीतील कुवारबाव ग्रामपंचायतीने 20 बेड क्षमतेचे कोविड आयसोलेशन केंद्र सुरु केले आहे. याचा लाभ जवळच्या नागरिकांना होत आहे. सध्याची कोरोना धोकादायक स्थिती पाहता सर्वत्र या साथरोगाचा प्रसार रोखणे जरुरी असल्याने आणि रुग्णांसाठी बेड उपलब्ध व्हावे या करिता कुवारबाव ग्रामपंचायने हा आदर्श उपक्रम हाती घेतला.

कुवारबाव सरपंच सौ.मंजिरी पाडळकर यानी पुढ़ाकर घेऊन उपसरपंच व सर्व सदस्य यांचे मदतीने कुवारबाव प्राथमिक शाळा उत्कर्ष नगर येथे अल्पावधित कोविड आयसोलेशन वार्ड सुरु केला आहे. याकरिता प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,आरोग्य सभापती उदय बने तहसीलदार ,गटविकास अधिकारी  जाधव यांचे मार्गदर्शन ही घेण्यात आले. उदयोजक मुकेश गुंदेचा आणि भाजपा कुवारबावचे  सतेज नलावडे, दीपक आपटे यानी हे केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली आणि मदत केली.

भविष्यात जर तिसऱ्या लाटेमधे गरज भासली तर या केंद्राचे कोविड केअर केंद्रात रुपांतर करण्याची तयारी देखील सरपंच सौ मंजिरी पाड़ळकर यांनी दर्शवली आहे. सामाजिक न्याय भवन येथेही कुवारबाव ग्रामपंचायत मदत करत आहे.