सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune) वैकुंठ स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार घडलाय. शुक्रवारी मध्यरात्री दोन तृतीयपंथीयांकडून चितेजवळ जादूटोण्याचं (Superstion) अघोरी कृत्य केल्याचं समोर आलंय. वैकुंठ स्मशानभूमीत (Cemetery) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने लक्ष्मी शिंदे आणि मनोज धुमाळे हे तृतीयपंथी चितेजवळ आले आणि त्यानंतर त्यांनी आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी कृती करीत होते.
हा सगळा प्रकार स्मशानभूमीमधील एक कर्मचाऱ्याने पहिला आणि पोलिसांकडे तक्रार केली. विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी आले आणि दोघांना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नरबळी आणि अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीदेखील या स्मशानभूमीत जादूटोण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अमावसेच्या दिवशी चितेवर लिंबू, टाचण्या आणइ कोंबड्या टाकल्याचं समोर आलं होतं,
सांगलीत रुग्णालायत तंत्रमंत्र
दोन दिवसांपूर्वीच सांगलीत चक्क एका रुग्णालयात तंत्र मंत्र केल्याचा प्रकार समोर आला होता. एका हॉस्पिलमधील रुग्णालयावर जादूटोणा करुन उपचार करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. रुग्णालयातील आयसीयूतमध्ये उपचार घेत असेलल्या रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून तंत्र मंत्र म्हणत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं होत. डॉक्टरांनी त्यांना विरोध केल्या असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील (Sangli news) आटपाडीतील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात ही धक्कादाय घटना घडली. मंत्रतंत्र आणि जादूटोणाच्या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचे चित्रीकरणमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमधून अंधश्रद्धा भोंदूगिरीचा प्रकार दिसून आला आहे.
कोल्हापुरातही अशी एक घटना
कोल्हापुरातही काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर आला होता. परडीत मुलींचा फोटो ठेऊन त्यावर हळद कुंकू, लिंबूला टोचलेल्या टाचण्या, हिरवं कापड असा उतारा ठेवल्याचा धक्कादायक घडल्याचं पाहायला मिळालं. बालिंगा-पाडळी रस्त्यावर हा जादूटोण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. हा अघोरी प्रकार कुणी केला...? याचा तपास आता पोलीस करत आहेत.