PUNE | पुणेकरांच्या खर्चात वाढ; PMP च्या तिकिटांचे दर महागणार

पुणेकरांचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. पीएमपीची बस सेवा तोट्यात सुरु आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी मनपा ग्रामीण भागातील तिकीटदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 9, 2022, 08:36 AM IST
PUNE | पुणेकरांच्या खर्चात वाढ; PMP च्या तिकिटांचे दर महागणार title=

पुणे : पुणेकरांचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. पीएमपीची बस सेवा तोट्यात सुरु आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी मनपा ग्रामीण भागातील तिकीटदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

 त्यामुळे ग्रामीण भागातील तिकीटाचे दर हे एसटी बस प्रमाणेच होतील.. तसंच रोजचा 70 रुपयांचा पासही बंद केला जाणार आहे. या निर्णयाचा फटका लाखो सामान्य प्रवाशांना बसणार आहे.

 
 दौंडमध्ये महावितरणाविरोधात शेतकरी आक्रमक
 
 पुण्यात दौंड तालुक्यामधील पिंपळगावात महावितरण कार्यालयासमोर शेतक-यांनी छावणी आंदोलन सुरू केलंय. महावितरणच्या अधिका-यांनी दाद न दिल्यामुळे, दिवसभर शेतक-यांनी कार्यालयासमोर ठिय्या दिला. 
 
त्यानंतर रात्री चूल पेटवून शेतक-यांनी तिथेच जेवणाची सोय केली. वीज पुरवठा खंडित करू नये या मागणीसाठी शेतकरी संघटना नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय.