महाराष्ट्र हादरला! शाळेच्या टॉयलेटमध्येच बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार

परभणीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बालवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 8, 2024, 03:52 PM IST
महाराष्ट्र हादरला! शाळेच्या टॉयलेटमध्येच बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार title=

Parbhani Crime News : बदलापूरमध्ये दोन चिमुरडीवर अत्यात झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना अशीच एक धक्कादायक घटना परभणीत घडली आहे.  इंग्रजी शाळेत बालवाडीत अर्थात एलकेजीत शिकणा-या विद्यार्थिनींवर अत्याचार झाला आहे. शाळेतील स्वच्छतागृहातच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

मुलीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे...अल्पवयीन मुलगी  इंग्लीश स्कूलमध्ये बालवाडीला शिकत आहे. 5 ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आल्यानंतर मुलीला सरळबसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पिडितेच्या अंगावर ओरखडे दिसून आल्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे पुढे आलंय.. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलंय..
या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात पोक्सो सह इतर कलमाखाली आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे.  याबाबत पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. 

अल्पवयीन मुलीवर सासरी अत्याचार

परभणीच्या सेलूमध्ये अल्पवयीन मुलीचं  लग्न लावून दिल्याची धक्कादायक बाब समोर आलीय... अल्पवयीन मुलीवर तिच्या सासरी बळजबरीने अत्याचार करण्यात आला,  पतीकडून तिला मारहाण करण्यात आली...  याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून, आई, वडील, पती, सासू-सासरे यांच्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...

पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणा-याला दहा लाखांचे बक्षिस 

पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणा-याला दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. आरोपीची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून हे बक्षीस देण्यात येणारेय. आरोपींचा शोध घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येतेय. पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती संकलित केली असून 200हून अधिक सराईतांचीही चौकशी करण्यात येणारेय. तसंच सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येतंय. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. मात्र आरोपींपर्यंत पोलीस अजूनही पोहोचू शकलेलं नाही.