Kartiki Ekadashi 2022 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आज पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाले. यावेळी दिंडीत विठुरायाचा गजर करत अमृता फडणवीस यांनी डोक्यावर तुळस घेतली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) फडणवीस दाम्पत्य पंढरपुरात दाखल झालं आहे. कार्तिकी एकादशीची महापूजा (Kartiki Ekadashi Mahapuja) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही पूजा करण्याचा मान मिळविणारे फडणवीस हे राज्यातील पहिलं दाम्पत्य ठरणार आहे. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे मंदिरात पूजा करण्यासाठी दाखल होणार आहेत. कार्तिकी एकादशीसाठी विठ्ठल मंदिर हे 15 प्रकारच्या फुलांनी सजवण्यात येणार आहे. यासाठी तब्बत 6 टन फुले वापरण्यात येणार आहे.
कार्तिकी यात्रेला येता आले याचा आनंद आहे. आता मोठ्या प्रमाणत भाविक आले आहेत. विठ्ठलाला एकच मागणं आहे महाराष्ट्र संपन्न सुजलाम सुफलाम व्हावा. विठ्ठल आपल्या पाठीशी म्हणून संकटे दूर होतात. अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
'आम्ही ढोंगी नाही, एकमेकांना विरोध करणारे एकत्र येतील तेव्हा मुकाबला करू असा टोला देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे यांना लगावला आहे. ठाकरे आंबेडकर युतीची चर्चा सुरू आहे. याबद्दल आता आम्हाला सवय झाली आहे. आमच्या विरोधात एकमेकांना विरोध करणारे आणि एकमेकांना पाण्यात पाहणारे एकत्र जेव्हा येतील तेव्हा त्यांचा मुकाबला करू असे आव्हान फडणवीस यांनी ठाकरे यांना दिले आहे. आपण जनतेच काम करत आहोत. पंतप्रधानांनी २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून त्यापैकी काही सुरू झाले आहेत . त्यामुळे निवडणुका आल्या की ढोंग करणारे आम्ही नाही. आम्ही पाच ही वर्ष काम करणारे लोक आहोत.'
जयंत पाटील यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, 'ते कोणाची चाकरी करतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.'