OBC Reservation | राज्यातील OBC आरक्षणाबाबत आज महत्वाची सुनावणी; तिढा सुटणार का?

ओबीसी आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल की नाही, या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

Updated: Feb 28, 2022, 09:28 AM IST
OBC Reservation | राज्यातील OBC आरक्षणाबाबत आज महत्वाची सुनावणी; तिढा सुटणार का? title=

मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल की नाही, या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

ओबीसी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता आगामी निवडणुकीत आरक्षण ठेवता येईल, असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे. त्यासंदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचे उत्तर याच सुनावणीवर अवलंबून आहे.