नागपूरमधल्या संघ मुख्यालय परिसरात इफ्तार पार्टीला परवानगी नाकारली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरमधल्या रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीची परवानगी नाकारण्यात आलीय.

Updated: Jun 5, 2018, 07:57 PM IST
नागपूरमधल्या संघ मुख्यालय परिसरात इफ्तार पार्टीला परवानगी नाकारली title=

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरमधल्या रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीची परवानगी नाकारण्यात आलीय. राष्ट्रीय मुस्लिम मंचानं संघाच्या स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीची परवानगी मागितली होती... संघाच्या स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यास सामाजिक समरसतेचा संदेश जाईल अशी त्यामागची भूमिका होती. मात्र संघाचा तृतीय वर्ष वर्ग सुरू असल्याचं कारण देऊऩ या पार्टीसाठी परवानगी नाकारण्यात आली. मुस्लिम राष्ट्रीय मंच ही संघ प्रेरित संघटना आहे. याबद्दल संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.