दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना

Navratri 2024 : दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2024, 09:18 PM IST
दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना title=

Jalgaon News: सर्वत्र नवरात्री उत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. अशात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जळगावमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गरबा खेळताना लखन वाधवाणी नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने दांडिया प्रेमींमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाचोरा शहरातील दांडिया गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी कॉलनी परिसरातील रहिवाशी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी वय २६ वर्षे हा दांडिया खेळत असतानाच त्याची तब्येत बिघडली अन त्याला चक्कर आले. त्यानंतर त्याला तत्काळ जवळील खाजगी उपचारसाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळालं नाही. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

लखन वाधवानी हा दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. त्याच्या कुटुंबाची अत्यंत नाजूक परीस्थिती आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून तो चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर कामाला होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे

गरब्यामध्ये हिंदू धर्मियांनाच प्रवेश मिळणार

विश्व हिंदू परिषदेकडून नवरात्री उत्सवासाठी अजब नियम काढण्यात आले आहेत... गरब्यामध्ये हिंदू धर्मियांनाच प्रवेश मिळणारेय... तसेच आधार कार्ड बघूनच, दांडिया खेळण्यासाठी नागरिकांना प्रवेश मिळेल... पारंपरिक पेहराव,कपाळावर टिळा, असे नियम  दांडिया खेळण्यासाठी बंधणकारक असेल...  राज्यभरात नवरात्री उत्सवामध्ये नियम पाळण्याचे, आवाहन विश्व हिंदू परिषदेनं  केले आहेत.. त्यामुळे संभाजीनगर आयोजकांकडून ही नियमावली काढण्यात आलीय.