नवनीत राणांनंतर अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांचीही महिलांकडून होळी, विधानसभेआधी राजकारण तापणार?

Abdul Sattar Saree Distribution:शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र या साडया महिलांनी जाळून टाकल्याच्या प्रकार समोर आलाय.

Updated: Oct 6, 2024, 07:37 PM IST
नवनीत राणांनंतर अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांचीही महिलांकडून होळी, विधानसभेआधी राजकारण तापणार? title=
अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी

विशाल करोळे, झी २४ तास, संभाजीनगर: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र या साडया महिलांनी जाळून टाकल्याच्या प्रकार समोर आलाय.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांनी नवरात्रीनिमित्त सिल्लोड सोयगाव मतदारसंघात महिलांना साड्याचं वाटप केलं..मात्र, अब्दुल सत्तारांनी दिलेल्या साड्यांची होळी करण्यात आलीये.. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालाय.हा व्हिडिओ सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील असल्याची माहिती आहे... यामध्ये काही महिला या रस्त्यावर साड्यांची होळी करताना दिसत आहेत.. सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांना अपशब्द वापरले होते. त्यामुळे संतप्त महिलांनी साड्यांची होळी केलीये..

'साड्या जाळणारे बोगस लोक'

महिलांनी आणि गावकऱ्यांनी जाळलेल्या साड्यांवरून अब्दुल सत्तार यांनी साड्या जाळणारे बोगस लोक असल्याचं म्हटलंय.इतक्या वर्षात साड्या वाटप केल्या नाहीत, कपड्यावरून लालूच दाखवण्याचं काम सुरु आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी करत सत्तारांवर निशाणा साधला. गेल्या काही महिन्यांआधी मेळघाटमध्ये नवनीत राणा यांनी वाटप केलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली होती.. त्यानंतर लोकसभेत राणांचा पराभव झाला.. आता विधानसभा निवडणुकी आधी अब्दुल सत्तारांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी करण्यात आलीये.त्यामुळे साड्यांच्या होळीचं राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रहारचा एकमेव आमदार शिवसेनेत, बच्चू कडू धक्क्यातून सावरणार?

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..विधानसभेसाठी बच्चू कडूंच्या पुढाकारानं राज्यभरात तिसरी आघाडी निर्माण करण्यात आलीये.. मात्र, त्यांच्या प्रहार पक्षात बिघाडी झाल्याचं चित्र आहे..आपला भिडू बच्चू कडू अशी अमरावतीत बच्चूभाऊंची ओळख... पण याच बच्चूभाऊंचा भिडू पळालाय. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडूंची साथ सोडलीय. महाराष्ट्रात सत्तापालट करण्याच्या मोहिमेवर निघालेल्या बच्चूभाऊंना त्यांच्याच साथीदारानं चकवा दिलाय. राजकुमार पटोलेंनी बच्चू कडूंच्या प्रहारची साथ सोडलीये. प्रहारची बॅट टाकून लवकरच ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिस-या आघाडीसाठी पुढाकार घेतला, पण त्याआधीचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंच्या एकमेव साथीदाराला पळवलं.. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना आपल्याचं जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय.. या धक्क्यातून कडू कसे सावरतात हे निवडणुकीनंतरच पाहायला मिळणार आहे.

विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?