प्रचंड व्हायरल होतोय 'या' वडापावचा Video; असं काय स्पेशल आहे 'या' वडापावमध्ये, पाहाच!

नुकतंच सोशल मीडियावर एक वडापावचा व्हिडीयो व्हायरल होतोय...

Updated: Sep 10, 2022, 03:03 PM IST
प्रचंड व्हायरल होतोय 'या' वडापावचा Video; असं काय स्पेशल आहे 'या' वडापावमध्ये, पाहाच! title=

नाशिक : वडापाव कोणाला आवडत नाही...वडापाव म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मस्त लाल तिखट आणि गोड चटणी सोबतचा गरमागरम वडापाव आता तुमच्या डोळ्यासमोर आला असेलच. इतकंच नाही तर हे वाचून तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लगेच वडापाव खाण्याचा प्लानही केला असेल...नुकतंच सोशल मीडियावर एक नाशिकचा वडापाव व्हायरल होतोय...

नाशिकचा हा चीज वडापाव आहेच असा स्पेशल...याची अजून एक स्पेशालिटी म्हणजे हा वडापाव तयार करणारी महिला गरम तेलात तळत असणारे वडे हाताने बाहेर काढताना दिसतेय. नाशिकच्या व्हायरल होणाऱ्या या वडापावच्या व्हिडीयोने अनेकांच्या जीभेला पाणी सुटलं असेल. 

सध्या या महिलेचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. इन्स्टाग्रावर एका फूड ब्लॉगरने हा व्हिडीयो तयार केला आहे. 

हा गरम गरम वडा खाण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. तुम्हीही पुढच्यावेळी नाशिकचा दौरा करणार असाल हा वडापाव नक्की टेस्ट करा.