प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे. या अन्नधान्याच्या लाभासाठी कार्डधारकांना त्यांचा आधार क्रमांक लिंक करणे सक्तीचे केले आहे. मात्र ते न केल्यास अन्नधान्य बंद होण्याची कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत तब्बल 65 हजार 940 लाभार्थ्यांना अन्नधान्य बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थींनी लवकर आधार कार्ड लिंक करावे असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 5 लाख 27 हजार अंत्योदय लाभार्थी आहेत तर 7 लाख 19 हजार प्राधान्य योजनेचे लाभार्थी आहेत.
असं लिंक करा आधार कार्ड (How To Link Aadhaar Ration Card Link)
1. uidai.gov.in वर जा.
2. स्टार्ट नाव 'Start Now' वर क्लिक करा.
3. विचारलेली सर्व माहिती भरा.
4. रेशन कार्ड बेनिफिट 'Ration Card Benefit' या पर्यायावर क्लिक करा.
5. त्यानंतर पुढे आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. 6. सर्व माहिती टाकल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
7. ओटीपी सबमिट केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Process Complete असा मेसेज दिसेल.
8. ही सर्व औपचारिकचा पूर्ण झाल्यावर आधार रेशन कार्डसह लिंक होईल.
ऑफलाईन असं लिंक करा
रेशन कार्ड आधारसह ऑफलाईन पद्धतीनेही लिंक करु शकता. यासाठी आधार कार्ड-रेशन कार्डची 1 झेरॉक्स आणि ज्या व्यक्तीच्या नावावर रेशन कार्ड आहे त्याचा 1 फोटो जमा करावा लागेल. रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card News) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) याआधीच मोफत शिधा डिसेंबर 2022 पर्यंत देणार असल्याचं जाहीर केलंय. रास्तभाव दुकानावर शिधाधारकांना स्वस्तात अन्नधान्य मिळतं. यासह इतरही फायदे असतात. केंद्र सरकारची वन नेशन वन रेशन कार्ड महत्त्वकांशी योजना आहे. सरकारच्या या योजनेनुसार देशभरातील असंख्य रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळतोय. रेशन कार्डाचा अन्नधान्यासह इतरही गोष्टींचा लाभ घेता येतो. आधार-रेशन कार्डसह लिंक केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो. आधारसह रेशन कार्ड लिंक असल्यास देशातील कुठल्याही दुकानातून रेशन घेता येतं.