महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय..  ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे.

वनिता कांबळे | Updated: Nov 8, 2024, 11:29 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा title=

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंचं '2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया' या पुस्तकामुळं वाद निर्माण झालाय. या पुस्तकात भुजबळ ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपसोबत कसे गेले यावर भाष्य करण्यात आलंय.

'अजित पवार यांच्य नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका... ती झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता.. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न, होता. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी  माझा पिच्छा सोडायला तयार नाही  असा दावा करण्यात आलाय. 

यावरून वाद झाल्यानंतर  भुजबळांनी जे म्हटलंय तेच पुस्तकात लिहिण्यात आल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांनी केलाय.. तर पुस्तकातील दावे खोटे असून कायदेशीर कारवाईचा इशारा भुजबळांनी दिलाय. राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात जे लिहिलंय ते अगदी बरोबर असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. पुस्तकातील सगळे दावे छगन भुजबळांनी खोडून काढलेत. सरदेसाईंच्या पुस्तकाचा अभ्यास सुरु असून वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं भुजबळांनी सांगितलंय. निवडणुकीच्या रणधुमाळीत भुजबळांविरोधात या पुस्तकाचा वापर केला जात असल्याचा भुजबळ समर्थकांचा आरोप आहे. पण या पुस्तकाच्या निमित्तानं सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर कसा होतो याची चर्चा पुन्हा सुरु झालीये.