Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...   

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: आज किंवा उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची माहिती.15व्या विधानसभेची अधिसूचना राज्यपालांकडून जारी. आता उत्सुकता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंबंधीच्या नावाची.... पाहा दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... 

25 Nov 2024, 08:34 वाजता

मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंचं लक्षवेधी वक्तव्य... 

मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केलंय.. काल मुंबईत शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक पार पडली.. या बैठकीत सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली.. यावर एकनाथ शिंदे 'काम सुरू आहे' असं म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या नजरा वळल्या. 

 

25 Nov 2024, 08:19 वाजता

पिंपरी चिंचवड पोलीसांकडून 55 किलो गांजा जप्त 

पिंपरी चिंचवड पोलीसांकडून 55 किलो गांजा जप्त करण्यात आलाय.  वाहनांची तपासणी करत असताना एक संशयित कार आढळून आली . दरम्यान कारची तपासणी केल्यानंतर 55 किलो गांजा आढळला. धुळ्याहून विक्रीसाठी हा गांजा आणला जात होता. याप्रकरणी आरोपी नूर मोहम्मद पिंजारीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली. 

 

25 Nov 2024, 08:16 वाजता

अंबरनाथ एमआयडीसीत मोठा स्फोट 

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रसिनो फार्मा कंपनीत रविवारी रात्री मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील प्लँट ऑपरेटर गंभीर जखमी झालाय. स्फोट झाला, तेव्हा कंपनीत 10 ते 12 कामगार काम करत असल्याची माहिती त्यानं दिलीये. 

 

25 Nov 2024, 07:56 वाजता

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही 

26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणं किंवी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. विधामंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची. 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणं किंवी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नाही असंही सूत्रांनी स्पष्ट केलं. 

 

25 Nov 2024, 07:51 वाजता

एकनाथ शिंदेंवर मोठी जबबादारी... 

एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड. सर्वानुमते एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड. उदय सामंतांनी मांडलेला ठराव एकमतानं मंजूर. मुंबईतील ताजलँड हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं निवड

 

25 Nov 2024, 07:49 वाजता

तुळजापूरमध्ये राणाजगजीतसिंहांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी 

तुळजापूरमध्ये राणाजगजीतसिंहांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलीय. बॅनरवर राणाजगजीतसिंह पाटील यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख आहे. राणाजगजीतसिंहांना मंत्रिपद मिळावं, यासाठी समर्थक मुंबईकेड रवाना झालेत. तर आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याची माहितीही सूत्राकडून मिळतेय.

 

25 Nov 2024, 07:46 वाजता

खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता 

देशात सर्वाधिक वापर होणाऱ्या पामतेल आयातीचे गणित बिघडल्याने त्याचा परिणाम अन्य खाद्यतेलांवर होऊन किमती वधारल्या आहेत. या वधारलेल्या किमतीची केंद्र सरकारने तातडीने दखल घेत 15 टक्के आर्द्रतायुक्त सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार असताना, दुसरीकडे खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

 

25 Nov 2024, 07:06 वाजता

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, CM पदासाठी फडणवीसांना संघाची पसंती  

विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळवल्यानंतर  मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती मिळतेय. एकीकडे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत सस्पेन्स कायम असताना भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अनुकूल आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकतीनिशी भाजपाच्या मागे उभा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत घसरलेला ग्राफ कमालीचा उंचावला अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तर वाढलीच. त्याचबरोबर भाजपाला घवघवीत यशही मिळालं .

25 Nov 2024, 07:02 वाजता

महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा - सूत्र

महायुतीमध्ये सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपदं मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे सध्या 132 आमदार त्यामुळे फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 22-24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता असून, शिवसेनेच्या 57 जागा आल्याने त्यांच्या वाट्याला 10-12 मंत्रिपदं येण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवली आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला 41 जागा आल्याने त्यांच्या वाट्याला 8-10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. 

25 Nov 2024, 06:59 वाजता

महायुतीच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार?

महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी अनेक दिग्गज उत्सुक. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या दिग्गजांना मंत्रिपदाचे वेध. शपथविधीदरम्यान  मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री घेणार शपथ. भाजपचे मंत्री कोण असणार याची उत्सुकता कायम. शिवसेनेच्या वेटिंगवरील नेत्यांना भेटणार मुख्यमंत्री.