कोल्हापूर : कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अजिबात उसंत घेतलेली नाही. जिल्ह्यात सर्वत्र कोसळत असलेल्या पावसानं राधानगरी धरण ८८ टक्के भरलं आहे.
पंचगगा नदीच्या पातळीत वाढ होतेय. जिल्ह्यातल्या 50 हून अधिक मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या मुसळधार पावसामुळे कोकणातून कोल्हापूरकडं येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर-सिंधुदुर्ग मार्ग बंद करण्यात आलाय. याबाबत कोल्हापूर पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांना सूचना केल्यात. कोल्हापूर जिल्ह्यात पूराच्या पाण्यात पाच खासगी बसेस अडकल्या आहेत.
गोव्यातून गगनबावडा मार्गे या पाच बसेस पुण्याला जात होत्या. त्यावेळी गगनबावडा कळे दरम्यान मार्गावर पाणी आल्याने रात्री एक वाजल्यापासून या बस अडकल्या. या बसमधील अडीचशे प्रवाशांना मदत हवीय. हे प्रवासी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.