‘खरा इतिहास दाखवल्यावर एका समाजाचा...’; जीवे मारण्याच्या धमकीनंतर इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया, 'नागपुराशी जोडला संबंध'

Indrajit Sawant Death Threat : कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकीचा फोन आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग शेअर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

नेहा चौधरी | Updated: Feb 25, 2025, 01:34 PM IST
‘खरा इतिहास दाखवल्यावर एका समाजाचा...’; जीवे मारण्याच्या धमकीनंतर इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया, 'नागपुराशी जोडला संबंध'

Indrajit Sawant Death Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबद्दलची पोस्ट त्यांनी फेसबुकला शेअर केली आहे. धमकीचा फोन कॉल रेकॉर्डिंगसह त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रशांत कोरटकर आणि मुख्यमंत्र्यांनाच्या नावाचा उल्लेख केलाय. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल भाष्य केलं. तर दुसरीकडे नागपूर येथील प्रशांत कोरटकरच याप्रकरणी समोर आले. त्यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा दावा त्यांनी केला. (Indrajit Sawant First reaction on Death Threat Shivaji Maharaj Maharashtra )

‘खरा इतिहास दाखल्यावर एका समाजाचा...’

इंद्रजीत सावंत म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक वर्ष अनेक जातीच्या समूहांच्या व्यक्तींचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविलं आहे. पण कधीच कुणी जातीचा गंड दाखवून विधान केलं नव्हतं. ज्या पद्धतीने उन्माद चढलेला दिसत आहे, तो सर्वत्र आहे. सरकारी अधिकारी बोलत नाही, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सांगू शकतो. एखाद्या जातीचं राज्य आलं असं काही लोकांना वाटत आहे. हे महाराष्ट्रात याच्या अगोदर कधी घडलेलं नव्हतं.

दरम्यान पत्रकाराने विचारलं की, प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली नाही, असं सांगितलंय. यावर तुमचं काय मत आहे. तर इंद्रजीत म्हणाले की, माझ्याकडे ट्रू कॉलवर जो नंबर आलाय. मला जो फोन कॉल आला त्यावर त्या व्यक्तीने तिचं नाव सांगितलं आहे. त्याचा पेक्षा जास्त काय पुरावा असू शकतो. एवढंच नाही तर माझ्या नावावर आणि फोटो टाकून त्याने सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. आता चोराच्या उलट्या बोंबा यावर कोण काय करणार, मला त्या प्रशांत कोरटकरबद्दल काही बोलायचं नाही.

पुढे ते म्हणाले की, शिवाजी महाराजांबद्दल जर असं कोणी बदलत असेल, तर गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात आहे, हा मोठा प्रश्न आहे. संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाकडे कुणी पकडून दिलं ही मांडणी मी केली. ती पुराव्याच्या आधारे केली. फ्रान्सिस मार्टिनने त्याची डायरी लिहिली आहे. ती प्रसिद्ध आहे. इंग्रजी भाषेत तेव्हाच ती ट्रान्सलेट केली आहे. फ्रान्सिसला मी सांगायलो गेलो नव्हतो की त्यात ब्राह्मणांनी संभाजी राजेंना पकडून दिलं. मी साडेतीनशे वर्षापूर्वी मी गेलो नव्हतो, असे सावंत म्हणाले.  इतिहास मांडताना जसाच्या तसा मांडला पाहिजे. त्यात ब्राह्मण द्वेष नाही. माझे सर्व पुस्तके पाहा. मी पुराव्यासहीत मांडत आलो. मी खरा इतिहास सांगितल्यावर समाजा समाजात द्वेष करतोय असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. माझा नाही, असे स्पष्टीकरण सावंत यांनी दिले.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.