मुंबई : नरवर नावाचा एक दूधवाला ५ वर्षात ७ हजार कोटींचा मालक झाला. तो कसा झाला? भाजप सरकार आल्यानंतर त्याचे येणे जाणे सुरू झाले. कुणी केले मनी लॉण्ड्रींग. यातील साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेलेत. महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
अमोल काळे कोण? विजय ढवांगळे कोण?...विनाकंत्राट कुणाला कामे दिली. ५ हजार कोटींचा हिशोब मला आलाय. निकॉन कंपनी किरिट सोमय्याची आहे. निल सोमय्याची आहे. वाधवान त्यात पार्टनर आहे. ८० ते १०० कोटी कॅश पीएमसी बँकेतून घेतली व लाडानीच्या नावावर जमिन घेतली. साडेचारशे कोटीची जमीन साडेचार कोटींना घेतली.
निकॉन फेज वन व टूचे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले गेले. पर्यावरण नियम झुगारून प्रकल्प उभे केलेत. यात आदित्य ठाकरेंनी लक्ष घालावे. ईओडब्ल्यूने नील सोमेय्याला अटक करावी. भ्रष्टाचारावर बोलायचं व आपले भ्रष्टाचार लपवायचं असा हा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
गजेंद्र लडानी हा सोमेय्यांचा फ्रंटमॅन आहे. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. हे फक्त ५ टक्के आहे. ईडीकडे सर्व पेपर पाठवले होते. तीन महिन्यांत तीन वेळा पेपर पाठवले. पण कारवाई नाहीच. राकेश वाधवानच्या अकाऊंटमधून बीजेपीच्या अकाऊंटला २० कोटी गेलेत ते कशासाठी असा सवाल त्यांनी केला,.
चुकीच्या लोकांसोबत पंगा
त्यांनी म्हणे पीएमसी बँक घोटाळा काढला व दुसरा काढला पत्रा चाळ घोटाळा. ते माझे मित्र आहेत म्हणून त्यांना फ्रेम केले गेले. मी अमित शहांना कॉल केला करून जे चाललंय ते ठीक नाही. माझ्यासोबत दुश्मनी असेल तर मला अटक करा, असे सांगितले आहे.
पत्राचाळची जमीन घेणारा मोहित कंबोज असून पीएमसी बँकेचा पैसा त्यात लागलाआहे. कंबोजने १२ हजार कोटींची जमीन वाधवानकडून खरेदी केली आहे. जितेंद्र नवलानी कोण आहे ? चार महिन्यांपासून ईडीच्या नावावर बिल्डरांकडून वसुली सुरूय. याबाबत पंतप्रधान मोदींना लिहणार ?
मुंबईच्या ६० बिल्डरांकडून या चौघांनी करोडींची वसुली केलीय. महाराष्ट्र, बंगाल व झारखंडचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांना धमकावत आहेत हे ईडीवाले. ८० वर्षाच्या म्हाता-याला धमकावत आहेत. हीच का मोदीसाहेब लोकशाही असा सवाल करतानाच "हम झुकेंगे नही लेकीन आपको झुकायेंगे " २०२४ ला देशात परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्य्कफ्ट केला.