नाशिक : मंदिरात एका भाविकाचा मृत्यू झाला. येथील त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात (Trimbakeshwar Temple) उपचाराअभावी भाविकाचा मृत्यू (Death of a devotee ) झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. हा भाविक दुपारी रांगेत असताना त्याला चक्कर आली आणि घाम सुटला. त्याला त्या ठिकाणी ना पाणी मिळाले ना उपचार. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला पाणीही मिळू शकले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमत्त मंदिरात विक्रमी गर्दी झाली आहे.
#BreakingNews । नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात उपचाराअभावी भाविकाचा मृत्यू । दर्शन रांगेत उभ्या भाविकाला पाणीही मिळू शकले नाही । महाशिवरात्रीनिमत्त मंदिरात गर्दीचा महापूरhttps://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/qx7f8oHVWk
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 18, 2020
नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रीदेवी सिंग यादव हा भाविक आला होता. तो दिल्लीतल्या नोएडा येथील राहणारा आहे. यादव त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात दर्शनाच्या रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्याक्षणी उपचार तर नाहीच मात्र पाणीही त्यांना मिळू शकलेले नाही. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासांनी त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांवर महाशिवरात्री आली आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढत असून, मंदिर प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.