पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जायला सक्षम आहेत, असा अहवाल ससून रुग्णालयानं दिलाय. सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डीएसकेंबाबतचा फैसला कोर्टात होणार आहे.
डीएसकेंना पुन्हा पोलीस कोठडी मिळते की त्यांची न्यायालयीन कोठडी कायम राहते, हे न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. तर डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय. त्यांनाही आज कोर्टात हजर केलं जाईल. त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ होते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याचा निर्णय कोर्टात होईल.
दरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष याला सात मार्च पर्यंत दिलासा मिळालाय. पोलीस सात मार्च पंर्यत शिरीष कुलकर्णीला अटक करु शकणार नाहीत.