मुंबई : राज्यात 24 तासांत 67 हजार 123 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 419 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 56 हजार 783 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. रूग्णांची वाढती संख्या पाहाता केंद्र आणि राज्य सरकार अनेक महत्त्वच्या भूमिका बजावत आहेत.
Maharashtra reports 67,123 fresh COVID cases, 56,783 discharges, and 419 deaths in the last 24 hours
Active cases: 6,47,933
Total discharges: 30,61,174
Death toll: 59,970 pic.twitter.com/UCRDvgmWe4— ANI (@ANI) April 17, 2021
तर मुंबईत आज 8 हजार 834 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 52 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे. नागपुरात आज 6 हजार 959 नवे कोरोनाबाधित रूग्ण , 79 रूग्णांचा मृत्यू
Mumbai reports 8,834 new #COVID19 cases, 6,617 discharges and 52 deaths
Total positive cases: 5,70,832
Total discharges: 4,69,961
Active cases: 87,369
Death toll: 12,294 pic.twitter.com/T9QHHjhbpF— ANI (@ANI) April 17, 2021
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 1 हजार 394 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 59 आहे. तर एका दिवसांत 1 हजार 722 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.