नागपूर : Nagpur Legislative Council Election : विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास राहिले असताना काँग्रेसने रविंद्र भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत मोठा धक्का दिला. मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसवर ही नामुष्की ओढवली आहे. दरम्यान भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शविल्याचे कारण काँग्रेसतर्फे देण्यात आले असले तरी तरी भोयर यांनी मात्र ते खोडून काढले आहे.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवणुकीसाठी नामांकन भरण्याच्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करून डॉ.रवींद्र तथा छोटू भोयर काँग्रेसमध्ये दाखल झाले.संघाचा स्वंयसेवक तसेच भाजपचा मोठा मोहरा पक्षात आल्यानंतर काँग्रेसनं भोयर यांना तिकिट देवून विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेसने त्यांचा हात सोडला आहे. निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात असणार्या मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं आपला पाठिंबा जाहीर केला.
उमेदवारी मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून भोयर प्रचारात नव्हते.त्यात दरम्यान ते काही कालावधीरता ते नॉट रिचेबल असल्याचे दावे काँग्रेस नेते करत होते.त्यामुळे त्यांच्या उमेदावारीवरून काँग्रेसमध्येच नाराजी होती. तर दुसरीकडे भाजपचे या निवडणुकीत पारडे जड असले तरी मंत्री सुनील केदार यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
भाजपने माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, अशीच सर्वांना आशा आहे. परंतु भोयर हे त्या तुलनेत कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र होते. त्यामुळे गेले दोन दिवस काँग्रेसकडून केदार,पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व स्थानिक ग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरु होत्या. त्यांनी भोयरऐवजी देशमुख यांना या निवडणुकीत पाठिंबा जाहीर करण्याचे निश्चित केले.
त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी बोलून काँग्रेसनं मतदानाच्या पूर्वी संध्येला भोयर यांचा पाठिंबा काढला.त्याबाबत प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, रवींद्र भोयर यांनी निवडणूक लढविण्यासाठी असर्मथता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं मतदानापूर्वी काँग्रेसमधील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला