'भाजपला पोटापाण्याच्या नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवायचेय'

देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल आहेत.

Updated: Oct 1, 2019, 05:35 PM IST
'भाजपला पोटापाण्याच्या नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवायचेय' title=

सातारा: भाजपला विधानसभेची निवडणूक ही पोटापाण्याच्या मुद्द्यावर नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर लढवायची असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते शुक्रवारी दक्षिण कराडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण दक्षिण कराड मतदारसंघातून लढणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर दोन गंभीर स्वरुपाची गुन्हे असल्याची माहिती निवडणूक आयोगापासून लपवली. त्यामुळे आता पारदर्शक कारभाराचा आग्रह धरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काय कारवाई करतात, हे मला पाहायचे आहे. 

भाजपची पहिली यादी पाहता भ्रष्टाचारी नेत्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचे दिसत आहे. परंतु, भाजप ही निवडणूक पोटापाण्याच्या मुद्द्यावर न लढवता भावनिक मुद्द्यांवर लढवू पाहत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. 

विनोद तावडे धास्तावले; भाजप कार्यालयात तीन तास खलबते
 
तसेच काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मिळून सातारा जिल्ह्यातील सर्व जागांबाबत निर्णय घेतला. त्यानुसार मी कराड दक्षिणमधून लढणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मी लढवावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा होती. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मी दक्षिण कराडमधूनच लढावे, असा आग्रह धरला होता. अखेर सर्व बाबींचा विचार करून साताऱ्याची पोटनिवडणूक श्रीनिवास पाटील लढतील, असा निर्णय झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

'साथ द्याल का?' पहिल्या यादीत नाव नसलेल्या खडसेंचं भावनिक आवाहन