भिवंडी एमआयडीसीत कंपनीला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान

भिवंडीमधील (Bhiwandi) सरवली इथल्या MIDCमध्ये भीषण आग लागली आहे.  

Updated: Jan 28, 2021, 08:45 AM IST
भिवंडी एमआयडीसीत कंपनीला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान  title=

ठाणे : भिवंडीमधील (Bhiwandi) सरवली इथल्या MIDCमध्ये भीषण आग लागली आहे. कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही आग लागली. (Fire broke out) आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कपडा आणि मशीन जळून खाक झाल्या आहेत. कंपनीच्या तळमजल्यासह दोन्ही मजल्यांना आगीने विळख्यात घेतले आहे. भिवंडी सह कल्याण ठाणे उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील सरवली एमआयडीसीमधील आगीत कोट्यवधी रुपयांचे मशीन, कपडा जळून खाक झाला आहे. ही कंपनी ग्राउंड प्लस दोन मजल्याची आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीला लागलेल्या आगीत, संपूर्ण बिल्डिंगमध्ये आग पसरल्याचे दिसून आले. आगीचे लोळ सर्वत्र पसरले असून मोठा भडका उडाल्याचं दिसत होते. दरम्यान, आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.