महाराष्ट्रात तालिबानी कृत्य! पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं

बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबण्यात आले. 

वनिता कांबळे | Updated: Jan 1, 2025, 11:00 PM IST
महाराष्ट्रात तालिबानी कृत्य! पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं title=

Beed Crime News : बीड मधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागीदारीच्या पैशांतून दोन व्यावसायिकांमध्ये वाद झाला. यानंतर पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबण्यात आले.  पायाच्या कुलूपासोबत भागीदाराने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी  पोलिसांत तक्रार दाखल करम्यात आली आहे. 

हे देखील वाचा... 2025 वर्ष सुरु होण्याच्या 13 दिवस आधीच खरी ठरलीय बाबा वेंगाची भविष्यवाणी! हा फक्त योगायोग नाही

भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आले आहे.  ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे या दोघांमध्ये भागीदारीत मसाल्याचा व्यवसाय आहे. हाच व्यवसाय वाढीसाठी हे दोघेजण 31 डिसेंबर रोजी मुंबईला  निघाले होते. मात्र दत्ता तांदळे याने सोबतच्या ज्ञानेश्वर इंगळे याला डांबून ठेवून जवळील एक लाखाहून अधिकची रक्कम लुटली.

केवळ एवढ्यावरच नाही तर ज्ञानेश्वर इंगळे याच्या पायाला कुलूप लावून डांबण्यात आलं. संधी शोधून ज्ञानेश्वर इंगळे याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. आता याच प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दत्ता तांदळे हा देखील पाटोदा येथील पोलीस ठाण्यात तक्रार देतोय. मात्र थेट पायाला कुलूप लावून आलेल्या या सर्व प्रकाराची सध्या चर्चा होऊ लागली आहे. 

मनमाडमध्ये एसटीत प्रवाशांची कंडक्टरला बेदम मारहाण 

मनमाडमध्ये एसटीत प्रवाशांनी कंडक्टरला बेदम मारहाण केलीय. एसटीत जागा नसल्याच्या कारणावरुन प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला. मनमाडच्या एसटी बस स्टँडवरही घटना घडलीये. मारहाणीत कंडक्टर जखमी झालाय. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीये. कंडक्टरच्या तक्रारीनंतर चार ते पाच प्रवाशांवर गुन्हा दाखल झालाय.