Beed Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता सीआयडीचा फोकस फरार असलेल्या तीन आरोपींवर आहे.सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने कंबर कसली. या तीन फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीचा राज्यभरात जोरदार तपास सुरू आहे.
खंडणीच्या गुन्हात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसलीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या दोन आरोपीच्या शोधासाठी सीआयडीकडून आता राज्यासह राज्याबाहेरही तपास सुरू करण्यात आलाय. कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.त्या दृष्टीनेही सीआय़डीचा तपास सुरू आहे.
सीआयडीच्या रडारवर ते तिघे आहेत. वाल्मिकच्या शरणागतीनंतर फरार आरोपी सीआयडीच्या रडारवर आहेत. फरार सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळेचा शोध सुरू असून मुख्य आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रात लपल्याची शक्यता आहे. तसेच कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे राज्याबाहेर लपल्याचा संशय आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली.. सुदर्शन घुलेच्या टाकळी या गावातही सीआयडीच्या पथकाने चौकशी केलीय..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असून आतापर्यंत 130 जणांची चौकशी करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या कुटुंब आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली. सुदर्शन घुले हा नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. सुदर्शन घुलेच्या लोकेशनबाबत चौकशी करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान सीआयडीसमोर आहे. सीआयडीने चहूबाजुंनी चौकशीची सुत्र फिरवायला सुरूवात केलीय. त्यामुळे आता लवकरात लवकर या आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरतेय.
पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकनं तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंगं केली. बीडमध्ये सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिकनं रात्रभरात जेवणच केलं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढचे चौदा दिवस कोठडीतून सुटका नसल्यानं आता वाल्मिक कोठडीतून बाहेर पडण्यासाठी चोरवाटा शोधू लागलाय. आजारी असल्याचं सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी वाल्मिक आता धडपड करु लागल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यानं काही सोंगं घेतल्याचा दावाही करण्यात येऊ लागलाय.