राज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.  

Updated: Oct 10, 2020, 09:33 PM IST
राज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह (२०.५ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

पुण्यात कोरोना आटोक्यात येतोय

पुण्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी, डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढणार असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार असल्याचे स्पष्ट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक पुण्यात आले असून, जम्बोसह बाधित क्षेत्राची पाहणी त्यांनी केली. कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचना ही केल्या आहेत. पुढील दीड महिना म्हणजे, म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र, संसर्गाचा वेग वाढण्याची शक्ययता तज्ञांनी वर्तवली
आहे

लातूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे आणखी ५ बळी गेलेयत. तर दिवसभरात १०२ रुग्ण वाढलेयत. जिल्ह्यातला बाधितांचा आकडा १८ हजार ७३३वर गेलाय़. तर आतापर्यंतच्या बळींचा आकडा ५४३ झालाय.  ऍक्टिव्ह रुग्ण १८८२ आहेत. १६ हजार ३०८ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झालेत. 

नाशिक जिल्ह्यात रुग्ण संख्येत कमी

नाशिक जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्येत कमी होत आहे.जिल्ह्यात 8 हजारात रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध आहेत . ऑक्सिजन पुरवठा देखील सुरळीत झालंय 50 मेट्रिक टन ऑक्सिजन सध्या रोज उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्याच्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद झाली त्यात ते माहिती देत होते. नवरात्रात उत्सव काळातील सर्व यात्रा रद्द सप्तश्रृंगी देवीची देखील यात्रा यंदाच्या वर्षी रद्द केलीय, तसेच गरबा आणि इतर कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घातल्याचं त्यांनी सांगितले.