Maharashtra Government Exams 2023 : कोरोना काळापासून सरकारी नोकर भरती खोळंबली आहे. सरकारने नोकर भरतीची घोषणा करत जाहीरात काढली. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी विभागनियाह परिक्षा देखील घेण्यात आल्या. लाखो तरुणांनी सरकारी नोकर भरतीच्या परिक्षा दिल्या. मात्र, अद्याप या परिक्षांचे निकाल लागलेले नाहीत. यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले 25 लाख तरुण संतापले आहेत.
शासकीय भरतीची परिक्षा होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत. जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये 6 विभागांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता नोव्हेंबर महिना संपत आला तरी या परीक्षांच्या निकालाचा पत्ता नाहीय. त्यामुळे शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 25 लाख तरुणांमध्ये संतापाची भावना आहे.
सरळसेवा परीक्षेच्या अनेक विभागांचे पेपर फुटलेत. तलाठी आणि वन विभाग भरती परीक्षेत गैरप्रकार घडला. यावर न्यायालयात याचिका दाखल केली. लवकरच सुनावणी सुरू होईल. मात्र, हे निकाल राखीव ठेवून इतर निकाल लवकर जाहीर करण्यात यावेत अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वयकांनी केली आहे.
राज्यात आजवर झालेली पेपरफुटी प्रकरणं तसच इतर गैरप्रकारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. पेपरफुटी प्रकरणाची तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलीय. तलाठी भरती, पोलीस भरती, वन विभाग भरती असो वा TET परीक्षा, विविध विभागाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.
पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याच्या निर्णयावरुन मोठा वादंग उठला होता. पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरती केली जाणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. कॅबिनेटच्या निर्णयात सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. फडणवीसांनी विधान परिषदेत याबाबत निवेदन दिलं. त्यावेळी पोलीस दलात कंत्राटी भरती होणार नाही असं त्यांनी सांगितलं.
ठाण्यात महानगरपालिका भवनात परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवण्यात आले होते. कंत्राटी परिचारिका पदासाठी 72 साठी ४५० हून अधिक उमेदवार आल्या होत्या त्यांना फरशीवर बसवून ठेवण्यात आलं यानंतर आवाज उठवल्यानंतर सर्व उमेदवारांना पालिकेच्या सभागृहात बसवण्यात आले.