मुंबई : विमानातून प्रवास सुरू करताना आपला मोबाईल बंद करा असा संदेश वैमानिक देत असतो मात्र आता आपण मोबाईल फोन विमानात वापरू शकाल. विमान प्रवासात भारतीय हवाई हद्दीत इंटरनेट आणि फोनचा वापर करू देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय.
टेलिकॉम कमिशनकडे हा प्रस्ताव प्रलंबीत होता, त्याला आता मान्यता मिळालीय. विमान प्रवासात आता मोबाईल फोन आणि इंटरनेटची सुविधा वापरता येणार आहे. मात्र हे कार्यान्वित होण्यासाठी अजून 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.