Budget 2021 : अर्थमंत्र्यांच्या साडीवरही पश्चिम बंगाल इम्पॅक्ट

अर्थमंत्र्यांची पश्चिम बंगालसाठी खास घोषणा   

Updated: Feb 1, 2021, 08:45 PM IST
Budget 2021 : अर्थमंत्र्यांच्या साडीवरही पश्चिम बंगाल इम्पॅक्ट

मुंबई : आजच्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं..... तर याचं उत्तर आहे बंगाल..... बंगालला डोळ्यासमोर ठेवून घोषणा झाल्या.... अगदी अर्थमंत्र्यांच्या साडीपासून योजनांपर्यंत सबकुछ बंगाल होतं. बजेट देशाचं, खैरात पश्चिम बंगालला वाटल्याचं चित्र समोर आलं आहे. पश्चिम बंगालवर योजनांचा धो धो पाऊस पडत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट मांडायला जी साडी नेसून आल्या, तीच मुळी पश्चिम बंगालला डोळ्यासमोर ठेवूनचं.  पांढऱ्या रंगाची आणि त्याला लाल काठ असलेली साडी पश्चिम बंगालमध्ये शुभ मानली जाते. लाल पाड साडी असं तिचं नाव आहे. दूर्गापूजेला आवर्जून ही साडी नेसली जाते. म्हणूनच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पांढऱ्या रंगाची, लाल काठाची हँडलूम पटोला साडी नेसली होती. लाल पाड साडीला बंगालच्या संस्कृतीत मोठं स्थान आहे. अर्थमंत्र्यांच्या साडीच्या या चॉईसची अर्थातच बंगालनं दखल घेतली असणार. अर्थमंत्र्यांनी बजेट मांडायला सुरुवात केली तीही रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेने. 

अर्थमंत्र्यांची पश्चिम बंगालसाठी खास घोषणा 

पश्चिम बंगालमधल्या हायवेंसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बंगालमध्ये ६७५ किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहे.
कोलकाता-सिलीगुडी मार्गाचं अपग्रेडेशन करण्यात येणार आहे

पश्चिम बंगालवर अशी खैरात करण्यात आलीय. एकीकडे पंतप्रधान मोदींचा रवींद्रनाथ टागोर लूक, दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची बंगाली संस्कृतीमधली साडी... यालाच म्हणतात बजेट पे निगाहे..... पश्चिम बंगाल पे निशाणा...