Dalai Lama Kisses Child: तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांचे संपूर्ण जगभरात भक्त आहेत. आपली विधानं, भूमिका, निर्णय अशा अनेक गोष्टींमुळे ते नेहमी चर्चेत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दलाई लामा यांनी लहान मुलाला ओठांवर किस करतानाचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दलाई लामा यावेळी लहान मुलाला आपली जीभ चोखणार का? अशी विचारणा करत जीभ बाहेर काढताना दिसत आहेत.
दलाई लामा लहान मुलाला ओठांवर किस करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यावेळी दलाई लामा यांनी मुलाला आपली जीभ चोखण्यास सांगितल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
व्हिडीओमध्ये लहान मुलगा दलाई लामा यांच्याप्रती आदर व्यक्त करत असताना सुरुवातीला ते त्याच्या ओठांवर किस करताना दिसत आहेत. यानंतर काही वेळाने ते त्याला आपली जीभ चोखणार का? अशी विचारणा करत जीभ बाहेर काढतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना संताप व्यक्त करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
जूस्ट ब्रोकर्स या महिलेने व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की "दलाई लामा यांनी बौद्ध कार्यक्रमात एका भारतीय मुलाला किस करत त्याच्या जीभेलाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ते चक्क माझी जीभ चोखणा का? अशी विचारणा करताना दिसत आहेत. पण त्यांनी असं का केलं असावं?".
दरम्यान एका युजरने हे घृणास्पद असून याचं स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे. तर Jas Oberoi नावाच्या युजरने कमेंट करत म्हटलं आहे की "हे मी काय पाहत आहे? हे दलाई लामा आहेत का? यांना तात्काळ अटक केली पाहिजे".
2019 मध्ये दलाई लामा यांनी जर महिला आपली उत्तराधिकारी होणार तर ती "आकर्षक" असावी असं विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. महिला दलाई लामा आली तर ती आकर्षक असावी असं ते म्हणाले होते. 2019 मध्ये धर्मशाळेतील नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याच्या निर्वासनातून प्रसारित झालेल्या ब्रिटीश ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं होतं. नंतर त्यांनी याप्रकरणी माफी मागितली होती.
गेल्याच महिन्यात दलाई लामा यांनी 8 वर्षाच्या बौद्ध मंगोलियन मुलाला तिबेटच्या बौद्ध धर्मातील महत्त्वाचा तिसरा आध्यात्मिक नेता म्हणून घोषित केलं होतं. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे हा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला मुलाच्या वडिलांसह ६०० मंगोलियन नागरिक उपस्थित होते.
बीजिंगने दलाई लामांवर तिबेटमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचा आरोप केला आहे तसंच ते भारत, नेपाळ, कॅनडा आणि अमेरिकेसह सुमारे 30 देशांमध्ये राहणाऱ्या सुमारे 100,000 निर्वासित तिबेटींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय तिबेट प्रशासनाला (CTA) मान्यता देत नसल्याचंही म्हटलं आहे.