उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.  

Updated: Apr 23, 2018, 08:34 PM IST
उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग  title=

नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.  

71 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांनी महाभियोगाची नोटीस 20 एप्रिल रोजी देण्यात आली होती. 71 खासदारांमध्ये काँग्रेस, माकप, भाकप, सपा, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुस्लिम लीग या पक्षांच्या खासदारांचा समावेश होता. 

नायडू यांनी सोमवारी हा प्रस्ताव निकालात काढत आपल्या आदेशात म्हटलं की 'त्यांनी न्यायमूर्ती मिश्रा यांच्याविरोधात लावलेल्या प्रत्येक आरोपाच्या प्रत्येक किनारीची तपासणी विश्लेषण करताना दिसतंय की ते आरोप स्वीकार करण्यायोग्य नाहीत'.  या आरोपांत संविधानाच्या सिद्धांतात येणाऱ्या न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्रतेला आळा घालणाऱ्या प्रवृत्ती गंभीर रुपानं दिसत आहेत, असं त्यांनी आपल्या आदेशात म्हटलंय.