पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा ठार करण्यात जवानांना यश आले आहे. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हाती आल्यानंतर मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. प्रत्युरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार मारण्यात यश आलेय. दरम्यान, लष्कराचा एक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
या चकमकीत जखमी झालेल्या सीआरपीएफच्या जवानाला तातडीने ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेय. काही दिवसांपूर्वी लष्करानं संबूरा गावातही शोध मोहीम हाती घेतली होती. या शोध मोहिमेदरम्यान, काही तरुणांनी जवानांवर दगडफेक करत या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, अशी सूत्रांच्या माहिती आहे.
Firing stopped, all neutralised, two bodies recovered, third being searched. Good job Army / CRPF/J&K Police.
— Shesh Paul Vaid (@spvaid) June 19, 2018
दरम्यान, याचा फायदा घेत दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून जवानांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांना पकडून आपल्या वाहनांसमोर बसवून ठेवले होते.
2 terrorists killed in an encounter with security forces in Pulwama's Tral. 1 CRPF personnel injured & has been evacuated to 92 Base Hospital. Operation underway. #JammuAndKashmir (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Iz1qrotuNa
— ANI (@ANI) June 19, 2018