Trending News in Marathi : शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी भेटतात. काही विद्यार्थी अभ्यासात खूप हुशार असतात. तर काही खोडकर, मस्ती करणारे आणि अभ्यासात लक्ष नाही. तर असंही काही विद्यार्थी असतात जे फक्त इतर स्पर्धा आणि खेळात एकदम तरबेज असतात. यात काही विद्यार्थी अगदी असेही असतात त्याचावर शाळेसह पालकांनाही खूप गर्व करतात. कारण ते अभ्यासासह खेळ आणि इतर कलागुणांमध्येही अव्वल असतात. शाळा, कॉलेज म्हटलं की, पेपर आलाच...हे पेपर तपासताना शिक्षकांना अनेक वेळा घाम फुटतो. काही विद्यार्थी प्रश्नांना अशी भन्नाट उत्तर लिहितात की, हसावं की रडावं हेच कळत नाही. असाच एका इतिहासातील प्रश्नावर एका विद्यार्थ्याने जे काही उत्तर दिलंय की, ते वाचून शिक्षण काय आपण पण कोमात जाऊ.
या विद्यार्थ्याचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही हे उत्तर वाचून स्वत:चं हसणे आवरु शकणार नाही. आता तुम्ही विचार करत असाल असं काय उत्तर लिहिलं या विद्यार्थ्याने? आम्ही तुम्हाला सांगतो, इतिहासाच्या पेपरमध्ये 1857 च्या क्रांतीवर प्रकाश टाका असं एक प्रश्न होता. त्यावर या विद्यार्थाने उत्तर लिहिलं की, मुलाने 1857 ची क्रांती असं लिहिलं आणि त्यासमोर टॉचने प्रकाश काढला आहे. त्यावर लिहिलं की, हे बघा टाकला प्रकाश...हा पेपर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे उत्तर पाहून नेटकरी हैराण तर झाले आहेत. शिवाय त्यांना हसू आवरत नाहीय.
हे उत्तर पाहून शिक्षकांनाही नक्कीच हसू की रडू नळलं नसेल. असे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील हे उत्तर अतिशय मजेशीर आहे. ही उत्तर पत्रिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील kim_.taehyung या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय.