Viral Video : आजच्या काळात तंत्रज्ञानाने जगणे जितकं सोपे केलंय तितक्याच अडचणी देखील लोकांसमोर आणल्या आहेत. तंत्रज्ञानाने कधीकधी लोकांना चागंलेच अडचणीत आणलं आहे. असाच काहीसा प्रकार एका मुलीसोबत घडला आहे. या मुलीने तंत्रज्ञानाचा असा काही वापर केला की ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे ती गोत्यात आली आहे. मृत वडिलांच्या फोटोंसोबत तरुणीने हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र काही वेळातच हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक प्रत्येक मर्यादा ओलांडतात. अनेक वेळा लोक इतके असंवेदनशील बनतात की ते नक्की काय करत आहे याची त्यांनाही कल्पना नसते. मृत वडिलांच्या फोटोसोबत मुलीने तयार केलेल्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या मुलीने मृत वडिलांच्या फोटोसोबत डॉग फिल्टर लावून सेल्फी शेअर केला आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर बरीच टीका होत आहे.
मुलीने तिच्या मृत वडिलांच्या फोटोसोबत लाइव्ह सेल्फी काढला आणि व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मुलीची ही कृती नेटिझन्सना अजिबात आवडलेली नाही. नेटकऱ्यांनी मुलीवर जोरदार टीका केली. व्हिडिओमध्ये मुलीने तिच्या मृत वडिलांच्या फोटोला डॉग फिल्टर लावले आणि तो व्हायरल केला. यासोबत बाबा असेही व्हिडीओमध्ये लिहीलं.
Ye gendu generation hai pic.twitter.com/14brkcr5Te
— Kisslay Jha(@KisslayJha) December 2, 2023
दरम्यान, हा व्हिडिओ तरुण पिढीची विचारसरणीच नाही तर व्हायरल कंटेंटचा घसरलेला दर्जाही दाखवतो. कोणीतरी त्याच्या मृत वडिलांना त्याच्या व्हिडिओसाठी हे सर्व कसे करू शकते? अशा प्रकारचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ पाहून त्या मुलीला कोणी माफ कसे करणार? व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका युजरने गंमत करत म्हटले की ही खूप हिट आहे. तर दुसर्या एका युजरने, हे पाहिल्यानंतर मी पुन्हा मुले जन्माला घालणार नाही, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, "हा मी पाहिलेला सर्वात वाईट व्हिडिओ आहे, असे म्हटलं आहे. पण काही युजर्सनी मुलीचे समर्थन देखील केले आहे. एका युजरने, 'मला यात काही वाईट दिसत नाहीये. तिला कदाचित तिच्या वडिलांची आठवण येत असेल... ते इथे नाहीत, तरीही ती त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवत आहे, असे म्हटलं आहे.