नवी दिल्ली : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी... आई या शब्दात सगळं सामावलं आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही. माणसापासून ते प्राणी आणि पक्षांपर्यंत प्रत्येकाला आई हवी असते. आईची माया-प्रेम तिची काळजी या सगळ्या गोष्टी बळ देणाऱ्या असतात. तिची माया अपार असते. आई आणि मुलाचं प्रेम हे माणासतच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळतं.
सध्या सोशल मीडियावर एका वाघिणीसह तिच्या बछड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाघीण आणि तिच्या बछड्याचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा बछडा आपल्या आईला खूप प्रेमानं मिठी मारत आहे. तिच्या कुशीत शिरत आहे. त्यांचं हे प्रेम आणि हा व्हिडीओ पाहणाऱ्याला आईची माय आणि प्रेम आठवल्याशिवाय राहणार नाही.
हा व्हिडिओ पुरस्कार विजेते दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमॅटोग्राफरसुब्बिया नल्लामुथु यांनी रेकॉर्ड केला आहे. याआधी त्यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला होता. आता हाच व्हिडिओ IFS अधिकारी सुधा रमन यांनीशेअर केला.
वाघीण आणि बछड्याचं हे निस्सिम प्रेम फार फारच दुर्मीळ पाहायला मिळतं. या खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगानं व्हायरल होत आहे. आई-मुलाचं हे प्रेम खूप जास्त काळजाला भिडणारं आणि भावुक करणारं आहे.
7 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 94 जणांनी हा रिट्वीट केला आहे. 500 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ जे पाहतात त्यांना आपल्या आईची आणि तिच्या प्रेमाची आठवण करून देणारा नक्की आहे असं म्हणायला हरकत नाही.
Sharing some pure love from the wild.. do watch!!
The world is full of love
All we need is harmony
With all around us and the nature!Emotions beautifully captured by Mr.Subbiah Nallamuthu @nalla33 pic.twitter.com/N6jivEmj8S
— Sudha Ramen (@SudhaRamenIFS) January 11, 2022