Trending Video : सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक वेळा आपण आर्श्चयचकित होता. काही व्हिडीओ पाहून तर आपल्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून तुम्ही नक्की हैराण व्हाल. आम्हाला सांगा तुम्हाला बुद्धिबळचा खेळ आवडतो का? जर आवडतं असेल तर चेस बोर्ड तुम्हाला माहिती असेल.
हा व्हिडीओ पाहून क्षणभर काही कळतं नाही, हा ब्रिज आहे की चेस बोर्ड. तामिळनाडूतील मामल्लापुरमध्ये 28 जुलैपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरु होणार आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईतील एक ब्रिज या स्पर्धेसाठी पहिलेच सज्ज झाला आहे. एका आईएएस ऑफिस सुप्रिया साहूने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा चेन्नईतील नेपियर ब्रिज आहे. हा ब्रिजपासून यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ 1 लाख यूजर्सने पाहिला आहे तर 2 हजार लोकांनी हा व्हिडीओ रीट्वीट केला आहे.
स्पर्धेसाठी सजवलेल्या नेपियर ब्रिजचा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत 187 देशांतील 2 हजारांहून अधिक खेळाडू भाग घेणार आहेत. तर चेन्नईतील नेहरू इनडोअर स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Chennai the Chess Capital of India is all set to host the grand, Chess Olympiad 2022.The iconic Napier Bridge is decked up like a Chess Board.Check it out #ChessOlympiad2022 #ChessOlympiad #Chennai pic.twitter.com/wEsUfGHMlU
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) July 16, 2022