शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थनांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थना विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  

Updated: Jan 10, 2018, 12:34 PM IST
शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थनांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका title=
Image Credit : YouTube

नवी दिल्ली : शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थना विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  

देशभरातील केंद्रीय विद्यालयात केली जाणारी प्रार्थना विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठविली असून सरकारनं चार आठवड्यात उत्तर द्यावे, असे कोर्टाचे आदेश आहेत. 

शाळांमध्ये होणारी प्रार्थना हिंदू धर्माला प्रोत्साहन देते. सरकारी मदतीने चालणा-या शाळांमध्ये विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देणारी प्रार्थना करण्यावर बंदी घालावी, याचिका कर्त्यांने कोर्टात म्हणने मांडले.