मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी संबधीत कंपनीचा अभ्यास असायला हवा. कंपनीच्या व्यवसायाविषयी बॅलेन्सशीटविषयी सविस्तर माहिती घ्यायला हवी. कोणताही विचार न करता केलेली गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. त्यामुळे गुंतवणूकीआधी योग्य अभ्यास गरजेचा असतो. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक उत्तम रिसर्च केलेला शेअर घेऊन येत आहोत.
मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी आज Sika Interplant कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचे भांडवल 250 - 300 कोटी इतके आहे. एअरोस्पेस, डिफेंस आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत.
सिका इंटरप्लांट कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 20 टक्के आहे. मागील 3 वर्षात CAGR साधारण 52-53 टक्के राहिला आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.
कंपनीची इक्विटी फक्त 4.25 कोटींची आहे. मागील 15 -20 दिवसांमध्ये या स्टॉकमध्ये थोडी घसरण दिसून आली आहे. कंपनीचे जून तिमाहीचे निकाल चांगले आहेत. कंपनी 1969 पासून काम करीत आहे. डिफेंसमध्ये सप्लाय करण्याचे कंपनीकडे परवाना असून HAL, BEL, L&T आणि टाटा पॉवर्स हे कंपनीच्या प्रोडक्टचे बायर्स आहेत.
CMP 592.15
TARGET 650
अवधी 6-9 महिने