Share Market : गेले दोन दिवस शेअर बाजारात (Share Market Opening Bell) सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजाराची आज (25 ऑगस्ट) सुरुवात तेजीसह झाली असून सुरवतीच्या सत्रात सेन्सेक्स 309 अंकांच्या तेजीसह 59,394 अंकांवर खुला झाला.
तर, निफ्टी 91 अंकांच्या तेजीसह 17,689 अंकांवर खुला झाला आहे. आज शेअर बाजारात दिवसभरात तेजी दिसून येईल असा अंदाज गुंतवणूकदारांकडून वर्तवण्यात येत आहे. आज सुरवातीला 45 शेअर तेजीत दिसत आहेत, तर पाच शेअर पडल्याचे दिसून येत आहे. तर काल सेन्सेक्स 54.13 अंकांच्या म्हणजेच 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 59,085.43 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.50 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 17,602.00 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी वर आणि खाली ट्रेंड करत आहे. सेन्सेक्स 250.88 अंकांनी वधारत 59338.31 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 69.90 अंकांनी वधारत 17674.90 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 303 अंकांच्या तेजीसह 59,389.15 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 99 अंकांनी वधारत 17,704.60 अंकावर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्समध्ये तेजी दिसत असून दोन कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली होती. त्याशिवाय निफ्टीतील 50 पैकी 43 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर 7 शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. बँक निफ्टी 276 अंकांच्या तेजीसह 39315 अंकाच्या पातळीवर व्यवहार करत होता.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
ओएनजीसी (ONGC)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
एनटीपीसी (NTPC)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
ऍस्ट्रल (ASTRAL)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
अशोक लेलँड (ASHOKLEY)