Rule Changes From 1 September 2022 : आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, ज्या नव्या नियमांचा थेट परिणाम तुमच्या सेविंग अकाऊंटवर होणार आहे. याबद्दल जाणून घेऊया...
नॅशनल पेंशन स्कीमच्या नियमांमध्ये आजपासून बदल होणार आहेत. आजपासून एपीएस अकाउंट ओपन केल्यावर पॉईंट ऑफ प्रेजेंसला कमिशन देण्यात येणार आहे. PoP च्या माध्यमातून एपीएसमध्ये लोकांना रजिस्ट्रेशन आणि इतर बऱ्याच सुविंधा उपलब्ध केल्या जात आहेत. आजपासून या लोकांना 10 रुपयांपासून ते 15 हजारांपर्यंत कमिशन दिलं जाणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांना केवायसी अपडेट करण्याची काल (31 ऑगस्ट) शेवटची तारीख होती. खातेदारांनी केवायसी नाही केली तर अकाउंट ब्लॉक केलं जाऊ शकतं. यामुळे तुमच्या अकाउंटचा वापर करताना अडचणी येऊ शकतात.
IRDAI ने असं सांगितलंय की, आजपासून पॉलिसीचा प्रीमियम कमी होणार आहे. IRDAI कडून जनरल ईंश्युरंन्सच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलानंतर खातेदारांना 30 ते 35 टक्क्यांऐवजी आता केवळ 20 टक्क्यांचं कमिशन एजंटला द्यावं लागणार आहे. यामुळे ग्राहकांचा प्रीमियम कमी होईल.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी, सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमतींचं विश्लेषण करतात. आजपासून LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. (LPG Gas Cylinder Price) दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.