Trending Video: इन्स्टंट कर्मा! चोरीची शिक्षा जागेवर मिळाली, झालं असं की...

Instant karma viral video: व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की एक चोरटा एका महिलेकडील सामान चोरण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated: Jan 9, 2023, 12:45 AM IST
Trending Video: इन्स्टंट कर्मा! चोरीची शिक्षा जागेवर मिळाली, झालं असं की... title=
Trending Video

Trending Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही धक्कादायक असतात. कलियुगात वाईट कर्मांची (Instant Karma) इन्स्टंट शिक्षा मिळणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आपण नेहमी सोशल मीडियावर पळ काढणाऱ्या चोरट्यांचे व्हिडिओ पाहतो. अनेकदा काही व्हिडिओमध्ये चोराला चांगलीच अद्दल घडवली जाते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. ज्यामध्ये एक चोरटा महिलेकडून सामान लुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण त्याच्या प्रयत्नांना मात्र यश मिळालेलं नाही असं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. () 

नेमकं व्हिडिओत काय?

हा व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की एक चोरटा एका महिलेकडील सामान चोरण्याचा प्रयत्न करत आहे. ती तिच्या बचावा करिता धडपड देखील करताना पाहायला मिळत आहे. तेवढ्यातच एक गाडी समोरून येत असते गाडीतील लोकांना उतरताना पाहून तो चोर घाबरतो आणि पळ काढण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच त्याची टक्कर समोरून येणाऱ्या गाडीवर होते आणि काही क्षणातच तो चोर जागी लागतो. यादरम्यान त्या चोरट्याला त्याच्या कर्माची शिक्षा ताबडतोब मिळते. या व्हिडिओवर लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हा व्हिडिओ ट्विटर वरील इन्स्टंट कर्मा या पेजवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पेज वरून नेहमीच लोकांना प्रेरित करणारे व्हिडिओ शेअर केले जातात. लोक हे व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करतात. या व्हिडिओला लोकांकडून कमालीची पसंती देखील मिळत आहे. 

पाहा Video - 

दरम्यान, हा व्हिडिओ ब्राझील मधील असल्याचं समजतंय. वाईट कर्मांची फळ लवकर मिळतात असं या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये अनेक फॉलोवर्स लिहिलं आहे. तर हे कलियुग आहे तिथेच करा आणि इथेच भरा असे देखील लोक कमेंट्स मध्ये लिहीत आहेत.