घरबसल्या मोबाईलवरुन मागवा रेशन, दुकानावर जाण्याची गरज नाही

. सरकारचं Mera Ration app नावाचे मोबाइल अ‍ॅप  

Updated: Apr 16, 2021, 03:21 PM IST
घरबसल्या मोबाईलवरुन मागवा रेशन, दुकानावर जाण्याची गरज नाही title=

नवी दिल्ली : कोरोना (Covid19) काळात नागरिकांचं बाहेर पडणं सुरक्षित राहीलं नाहीय. पण रेशन (Ration Card) घेण्यासाठी लोकांना दुकानापर्यंत जाव लागतं. हे देखील एकप्रकार धोका पत्करण्यासारखं आहे.  पण आता एपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन ऑर्डर देऊ शकणार आहात. सरकारने Mera Ration app नावाचे मोबाइल अ‍ॅप आणले आहे.

हे मोबाइल एप सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या  एक भाग आहे. या अ‍ॅपच्या डाउनलोड करण्यापासून रेशन ऑर्डरपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

Mera Ration app कसे डाउनलोड कराल ? 

सर्वप्रथम आपण आपल्या मोबाइलमध्ये Google Play Store वर जा. तिथे सर्च बॉक्समध्ये Mera Ration app शोधा. 

मेरा रेशन अपमध्ये नोंदणी - अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात तुमचा रेशनकार्ड नंबर नोंदवावा लागेल. यासाठी प्रथम अ‍ॅप उघडा. आपल्याला नोंदणीचा ​​पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये आपला रेशन कार्ड नंबर टाकून सबमिट बटण दाबा.

मेरा रेशन अ‍ॅपचे फायदे

या मोबाईल अ‍ॅपचा फायदा नोकरीसाठी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाणार्‍या बर्‍याच लोकांना होणार आहे. इतर शहरांमध्ये त्यांना रेशन दुकानांविषयी माहिती नसते, या अ‍ॅपमध्ये जवळच्या दुकानांबाबतही संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.

रेशन कधी आणि किती येईल याबद्दल आपल्याला यातून संपूर्ण माहिती मिळेल. तसेच तुम्हाला किती रेशन मिळते ?, ही माहिती या अ‍ॅपद्वारे उपलब्ध होईल. या अॅपद्वारे आपल्या मागील व्यवहाराचा तपशील देखील आपल्याला ठाऊक होईल. 

हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, लवकरच ते अन्य 14 भाषांमध्येही उपलब्ध होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या अ‍ॅपच्या माध्यातून दुकानातून रेशन कधी आणि कोणत्या दुकानातून घेण्यात आले ? याचीही माहिती मिळणार आहे.