लालू गेले तुरूंगात, राजदची सूत्रे राबडींच्या हातात..

लालूंच्या तुरूंगात जाण्याने राष्ट्रीय जनता दल अनाथ होईल असे म्हटले होते. मात्र, राजद अनाथ होणे तर सोडाच पण, राजदचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 25, 2017, 12:19 PM IST
लालू गेले तुरूंगात, राजदची सूत्रे राबडींच्या हातात..
संग्रहीत छायाचित्र

नवी दिल्ली : लालू प्रसाद यादव यांची रवानगी तुरूंगात झाल्यावर राष्ट्रीय जनता दलाची सूत्रे कोणाकडे जाणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. काहींनी तर, लालूंच्या तुरूंगात जाण्याने राष्ट्रीय जनता दल अनाथ होईल असे म्हटले होते. मात्र, राजद अनाथ होणे तर सोडाच पण, राजदचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच, लालू यांच्यानंतर राजदची सूत्रे ही राबडीदेवी यांच्या हातात गेली आहे. राबडी या लालूंच्या पत्नी आहेत.

बिहारमधील राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय जनता दलाची सूत्रे राबडीदेवी सांभाळणार असून, त्यांना तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव मदत करणार आहेत. चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव दोषी तर ठरले. त्यामुळे त्यांची रवाणगी थेट तुरूंगात झाली. मात्र, अद्याप त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली नाही. नववर्षाच्या तिसऱ्या दिवशी. म्हणजेच, येत्या 3 जानेवारीला लालूंना न्ययालय शिक्षा ठोठावणार आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतरच लालूंना वरच्या न्यायालयात दाद मागता येणार आहे.

लालूंनी वरच्या न्यायालयात दाद मागितल्यावर तेथे जो निर्णय सुनावण्यात येईल त्यावर लालूंचे राजकीय भविष्य ठरणार आहे. मात्र, तोपर्यंत तरी लालूंचा मुक्काम हा तुरूंगातच राहणार आहे. दरम्यान, तोपर्यंत राबडी देवीच पक्षाची सूत्रे सांभाळतील. तसेच, येणाऱ्या निवडणुकात राष्ट्रीय जनता दल हे जनतेला भाऊक आव्हान करेन. तसेच, लालू कसे निर्दोष आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करेन. सोबतच राष्ट्रीय जनता दल काँग्रेससोबतच इतरही काही राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्याची शक्यता आहे.