नवी दिल्ली : रेप प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले डेरा सच्चाचे प्रमुख गुरमित राम रहीम यांना दहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायधिश जस्टिस जगदीप सिंग यांनी रोहतक जेलमध्ये बनविण्यात आलेल्या स्पेशल कोर्टात आज शिक्षा सुनावण्यात आली. रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये दुपारी २.३० वाजेपासून सुनावणी सुरू झाली.
शिक्षेवर सुनावणी दरम्यान सीबीआयच्या वकिलांनी कोर्टाला राम रहिम यांना जास्त जास्त शिक्षा सुनावण्याची मागणी केली. यावर गुरमित राम रहिम यांच्या वकिलांनी ते सामजिक काम करतात असे म्हणणे मांडले. त्यामुळे कोर्टाने दया भावना दाखवावी असे म्हणणे मांडले.
Rape case: Defence argues #RamRahimSingh is a social worker who has worked for welfare of people, so judge should take a lenient view.
— ANI (@ANI) August 28, 2017
वृत्तसंस्था एएनआय ने दिलेल्या बातमीनुसार कोर्टात गुरमित राम रहिम हे न्यायाधिशांसमोर याचकाप्रमाणे माफी मागत होते मला माफ करा.. मला माफ करा...